७. मानवी वस्ती
प्रश्न १ — अचूक पर्याय निवडा
(अ) वस्त्यांचे केंद्रीकरण कोणत्या घटकाशी निगडित?
(i) समुद्रसान्निध्य
(ii) मैदानी प्रदेश
(iii) पाण्याची उपलब्धता
(iv) हवामान
उत्तर – (iii) पाण्याची उपलब्धता
(आ) ब्राझीलच्या आग्नेय भागातील वस्ती प्रकार कोणता?
(i) केंद्रित
(ii) रेषाकृती
(iii) विखुरलेली
(iv) ताराकृती
उत्तर – (i) केंद्रित
(इ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्या कोठे आढळतात?
(i) नदीकाठी
(ii) वाहतूक मार्गांच्या लगत
(iii) डोंगराळ प्रदेशात
(iv) औद्योगिक क्षेत्रात
उत्तर – (iii) डोंगराळ प्रदेशात
(ई) नर्मदा नदी खोऱ्यात केंद्रित वस्ती का आढळते?
(i) वनाच्छादन
(ii) शेतीयोग्य जमीन
(iii) उंचसखल जमीन
(iv) उद्योगधंदे
उत्तर – (ii) शेतीयोग्य जमीन
(उ) ब्राझीलमध्ये कमी नागरीकरण असलेले राज्य कोणते?
(i) पारा
(ii) आमापा
(iii) एस्पिरितो सान्तो
(iv) पॅराना
उत्तर – (i) पारा
प्रश्न २ — भौगोलिक कारणे लिहा
(अ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
- मनुष्याच्या दैनंदिन जीवनासाठी पाणी अत्यावश्यक असते.
- शेती, उद्योग, पशुपालन या सर्वांसाठी पाणी महत्त्वाचे आहे.
- पाणी नसल्यास शेती विकसित होत नाही आणि रोजगार तयार होत नाही.
- पाण्याच्या अभावामुळे वस्त्या निर्माण होऊ शकत नाहीत.
- पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे शेती व उद्योग वाढतात आणि लोकवस्ती वेगाने निर्माण होते.
(आ) ब्राझीलमध्ये लोकवस्ती पूर्व किनाऱ्यालगत केंद्रित आहे.
- सुरुवातीच्या युरोपीय वसाहती पूर्व किनारपट्टीवर स्थायिक झाल्या.
- या भागात सौम्य व दमट हवामान आढळते.
- शेतीयोग्य जमीन आणि पाण्याची चांगली उपलब्धता आहे.
- बंदरे, उद्योग आणि व्यापार सुविधा या भागात मोठ्या प्रमाणात वाढल्या.
- रोजगार संधी असल्यामुळे लोकसंख्या पूर्व किनाऱ्याकडे आकर्षित झाली.
(इ) भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
- शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विकासामुळे रोजगार वाढत आहे.
- शिक्षण, आरोग्य व वाहतूक सुविधा शहरांत जास्त उपलब्ध आहेत.
- ग्रामीण भागातून लोक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करतात.
- नवे उद्योग आणि तंत्रज्ञान शहरांत केंद्रित होत आहेत.
- शहरांचे भौगोलिक आकार व लोकसंख्या दोन्ही सातत्याने वाढत आहेत.
(ई) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.
- हा भाग पर्जन्यछायेचा असून येथे खूप कमी पाऊस (सु. ६०० मिमी) पडतो.
- हा प्रदेश 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.
- पाणीटंचाईमुळे शेतीचा विकास अत्यंत मर्यादित आहे.
- रोजगाराच्या संधी कमी असल्याने ग्रामीण भागात विखुरलेल्या वस्त्या आढळतात.
(उ) दिल्ली व चंदीगडमध्ये नागरीकरण जास्त आहे.
- दिल्ली ही भारताची राजधानी असल्यामुळे तिथे उद्योग, सेवा आणि कार्यालयांचे जाळे आहे.
- चंदीगड हे सुयोजित शहर असून दोन राज्यांचे प्रशासन केंद्र आहे.
- दोन्ही शहरे सुपीक मैदानी प्रदेशात असल्याने विकास करणे सोपे झाले आहे.
- वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या मुबलकतेमुळे येथे नागरीकरण इतर भागांपेक्षा जास्त आहे.
प्रश्न ३ — थोडक्यात उत्तरे लिहा
(अ) भारत व ब्राझील — नागरीकरणाचा तुलनात्मक आढावा
- ब्राझीलमध्ये नागरीकरण भारतापेक्षा खूप जास्त आहे.
- भारतातील २०११ मधील नागरीकरण ३१.२% होते, तर ब्राझीलमध्ये २०१० मध्ये ते ८४.६% इतके होते.
- दोन्ही देशांत नागरी लोकसंख्या सातत्याने वाढत आहे.
- भारतात नागरीकरणाचा वेग दशकानुसार बदलतो, तर ब्राझीलमध्ये वाढीचा दर आता हळूहळू स्थिरावत आहे.
(आ) गंगा खोरे व ॲमेझॉन खोरे — मानवी वस्त्यांतील फरक
| वैशिष्ट्ये |
गंगा नदी खोरे (भारत) |
ॲमेझॉन नदी खोरे (ब्राझील) |
| हवामान |
सौम्य हवामान आणि पुरेसा पाऊस. |
अतिआर्द्र, उष्ण आणि रोगट हवामान. |
| भूरचना |
गाळयुक्त सुपीक मैदानी प्रदेश. |
दुर्गम आणि घनदाट वर्षावने. |
| विकास |
शेती, उद्योग आणि वाहतुकीचा मोठा विकास. |
वाहतुकीचा अभाव आणि मर्यादित संसाधने. |
| वस्ती प्रकार |
केंद्रित आणि दाट लोकवस्ती. |
विरळ आणि विखुरलेली वस्ती. |